कनेडी राड्या प्रकरणी वैभव नाईकांसह ठाकरे गटाच्या नेत्यांना दिलासा

अटकपूर्व जामीन मंजूर ; अॅॅड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
Edited by: ब्युरो
Published on: April 19, 2023 13:35 PM
views 164  views

कणकवली : काही दिवसांपूर्वीच कनेडी येथे झालेल्या राड्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल असलेल्या आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी मंजूर केला आहे. या तीनही संशयीतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला.

24 जानेवारी 2023 रोजी माघी गणेश जयंती ची तयारी सुरू असताना या अनुषंगाने या गुन्हयातील आरोपी कुणाल सावंत याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मारहाण केली. या झटापटीत गोट्या सावंत यांचा आयफोन चोरून नेला. त्यानुसार याप्रकरणी गोट्या सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांच्या सांगण्याने जमावाला भडकवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला व राडा घडविण्यासाठी या तिघांनी जमावाला भडकावून केले अशी फिर्याद माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली होती. या दरम्यान आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन पोलीस व इतरांना धमकावण्याचा व भडकवण्याचा प्रयत्न करत होते. आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हया पारकर यांनी जमावाला उद्युप्त केल्याने गोट्या सावंत यांना जबर मारहाण करण्यात आली. यामुळे गोट्या सावंत यांच्या छाती, पाय, हाताला गंभीर दुखापत केली व मृत्यू होऊ शकेल इथपर्यंत मारहाण केली.

त्यानुसार आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांच्याकडे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार या अर्जावर सुनावणी होत या तिघांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी न्यायालयासमोर यशस्वी युक्तीवाद केला.