
सावंतवाडी : जुनाबाजार - करोलआवाट परिसरात रात्रीच्या सुमारास १० फुटी अजगर दिसून आला. अंगणात आलेल्या या अजगराला स्थानिकांनी पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडलं. मुसळधार होणाऱ्या पावसात रात्रीच्या सुमारास हा अजगर दिसून आला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी रिझवान शेख, आरिफ करोल, शैबाज शेख या युवकांनी त्या अजगराला पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.