कणकवली विभागातील आरक्षण सोडत जाहीर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 05, 2023 17:38 PM
views 122  views

कणकवली : कणकवली तालुक्यासह वैभववाडी देवगड या कणकवली उपविभागातील 14 कोतवालांच्या पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात चार ऑगस्ट रोजी कणकवली तहसील कार्यालयात काढण्यात आली. यात कणकवली तालुक्यातील सहा, देवगड व वैभववाडी तालुक्यातील प्रत्येकी चार पदांच्या सोडतीचा समावेश आहे.

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसीलदार कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी परिविक्षाधीन प्रांताधिकारी करिष्मा नायर कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे देवगड तहसीलदार रमेश पवार वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई निवासी नायब तहसीलदार गौरी कट्टे आदी उपस्थित होते.

कणकवली तालुक्यातील आरक्षण सोडतीमध्ये कलमठ कोतवाल पद भटक्या जमाती क प्रवर्ग, वरवडे भटक्या जमाती ड प्रवर्ग महिला, घोणसरी अनुसूचित जमाती, लोरे व नांदगाव ओबीसी प्रवर्ग तर दिगवळे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

देवगड तालुक्यातील गवाणे कोतवाल पद अनुसूचित जमाती, वळीवंडे इडब्ल्यूएस, उंडील सर्वसाधारण प्रवर्ग महिला तर कुवळे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले. 

वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ सौंदळ विमुक्त जाती-अप्रवर्ग,  कुसुर भटक्या जमाती ड प्रवर्ग, भुईबावडा इतर मागास प्रवर्ग तर आचिरणे इडब्लूएस महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. असल्याने आता या तिन्ही तालुक्यात कोतवाल भरती होणार आहे त्यासाठी लेखी परीक्षा देखील असल्याचे प्रांताधिकारी कातकर यांनी सांगितले.