
सावंतवाडी : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर सगरे तसेच सेक्शन इंजिनियर लोहार यांची भेट घेतली. यावेळी तिरोडा नाणोस जोडणाऱ्या पूलाचे काम झालेले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूने रिटेनिंग वॉल आवश्यक आहे. याबाबत भोसले यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत लक्ष वेधलं.
ते म्हणाले, या अगोदर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री केणी यांनी चांगले सहकार्य दिले आहे. पुढे देणार आहेत. या दोन्ही बाजूच्या रिटर्निंग वॉल एस्टिमेट 1कोटी 78 लाख मंत्रालयात बांधकाम खात्याकडे पाठवण्यात आले आहे. हे पूल माजी खासदार विनायक राऊत यांनी नाबार्ड कडून 2 कोटी 50 लाख मंजूर केले होते. या पुलाच्या पुढील रिटेनिंग वॉल्स संदर्भात महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन मंजूर करण्याचे बैठकीमध्ये ठरवण्यात आले असं प्रवीण भोसले म्हणाले. या बैठकीला तिरोडा उपसरपंच संदेश केरकर, बाबल ठाकूर, सुरेश शेटे, सागर नानोसकर श्रीपाद ठाकूर, भास्कर गोडकर,मनोज वाघमोरे उपस्थित होते. यापूर्वी नानोस सरपंच सौ सीमा साटेलकर शेट्ये यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. या पुलाचा फायदा नाणोस तिरोडा गुळदुवे तसेच शिरोडा या वाहतुकीस होणार आहे. पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येत असल्यामुळे लवकर शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी जनतेन केली आहे.