
सावंतवाडी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी याबाबत माहिती दिली. त्या ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्यामुळे घाटात रात्रीच्या वेळी गाड्या चालवणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागते. याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता त्यानुसार तात्काळ रिफ्लेक्टर लावण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्री दिल्याचे संदीप गावडे यांनी सांगितले.