पोलिसांना 'रिफ्लेक्टर जॅकेट'

उद्योजक रमेश भाट यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: July 12, 2024 09:29 AM
views 133  views

सावंतवाडी : कायदा व सुव्यवस्था राखताना जॅकेटची आवश्यकता असते ही गरज ओळखून शहरातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक रमेश भाट यांनी सावंतवाडी पोलिसांना २५ जॅकेट दिली आहेत. तर लवकरच आणखी २५ जॅकेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही जॅकेट त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली. त्यामुळे आंबोली येथे वर्षा पर्यटनाला सेवा बजावणारे पोलीस आता 'रिफ्लेक्टर जॅकेट' घालून सेवा बजावणार आहेत. 


आंबोली वर्षा पर्यटनस्थळी पोलिस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करत असतात. तेव्हा रिफ्लेक्टर जॅकेटची गरज असते. त्यामुळे ते उपलब्ध करून दिले आहे असे रमेश भाट यांनी सांगितले.यावेळी अँड नकुल पार्सेकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, पोलिस पी. के. कदम, राजा राणे, अमित राऊळ आदी उपस्थित होते.