'जल्लोष रामलल्ला'चा ; सावंतवाडीत 'रिल्स' स्पर्धा !

ओंकार कलामंचाचा पुढाकार
Edited by: भगवान शेलटे
Published on: January 20, 2024 12:22 PM
views 130  views

सावंतवाडी : ओंकार कलामंचाच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या "जल्लोष रामलल्लाचा" या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर "रिल्स" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम वाचन मंदिराच्या समोर होणार्‍या जल्लोष रामलल्लाचा या कार्यक्रमाचे व्हिडीओ त्यात असणे बंधनकारक असणार आहे. या स्पर्धेअंतर्गत कार्यक्रमाची रिल्स तयार करणार्‍या स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही बक्षिसे महालक्ष्मी तथास्तू मॉल  यांच्या माध्यमातून विनायक कोंडल्याळ यांनी पुरस्कृत केली आहेत. 

दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके श्री सावंवताडी पाटीदार समाजचे अरविंद पोकार व मुकेश पटेल  यांच्यावतीने  तर वेशभुषा स्पर्धा पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचे पावन चोडणकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे त्यात अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय अशी ३ हजार, २ हजार आणि १ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 

     दरम्यान रिल्स स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही संबंधितांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येवून रिल शुट करायची आहे. तसेच ही रिल २६ जानेवारी पर्यंत ओंकार कलामंचाच्या  'omkar_kalamanch' या इंस्टाग्राम आयडीवर मेन्शन करावी, बनवलेली रिल ३० सेंकदापेक्षा जास्त असू नये,  सहभागी इच्छिणार्‍या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी सिध्देश सावंत-: 9130582166 , नितेश देसाई:- 8275211126  यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ओंकार कला मंचचे अध्यक्ष अमोल टेबकर व अनिकेत आसोलकर यांनी केले