
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील देसाई वाडा येथील संतोष लक्ष्मण परब यांच्या रेड्याला विद्युत तारेचा स्पर्श होऊन रेडा मृत पावला आहे. ही घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडली. त्यांचे भाऊ रवींद्र परब यांनी लागलीच महावितरण ला याबाबाबत कल्पना दिली. त्या नंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन विद्युत तारा सुरळीत केल्या. पशू वैद्यकीय अधिकारी सतीश कांगुले देखील घटनास्थळी आले होते. परब कुटुंबीयांनी त्यांच्याजवळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.