रेडी उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मीकांत भिसे बिनविरोध

रेडी उपसरपंच पदी लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड होताच भाजपाच्या वतीने अभिनंदन
Edited by:
Published on: January 17, 2025 11:20 AM
views 196  views

वेंगुर्ले : तालुक्यातील  रेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मीकांत उर्फ आनंद भिकाजी भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच नमिता नागोळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज  रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गणेश बागायतकर, ग्रा.पं. सदस्य नमिता नागोळकर ,

रिया सावंत , विनोद राणे , रश्मी रेडकर , शमिका नाईक , तुळशीदास भगत , सागर रेडकर , प्रज्ञा राऊळ , सोनाली कलच्यावकर , मानसी राणे.  तसेच माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्या चित्रा कनयाळकर , माजी सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते.ही निवड जाहीर झाल्यानंतर वेंगुर्ले भाजपच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच लक्ष्मीकांत भिसे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,तालुका सरचिटणीस पप्पू परब , शक्तिकेंद्र प्रमुख जगन्नाथ राणे व गजानन बांदेकर , बूथप्रमुख अरुण राणे , विनोद नाईक , ओंकार कोनाडकर, तसेच भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.