सिंधुदुर्गला रविवारी रेड अलर्ट !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 13, 2024 15:24 PM
views 71  views

सिंधुदुर्गनगरी  : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१३ जुलै २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून दि.१४ जुलै २०२४ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दि.१५ जुलै २०२४ ते दि.१७ जुलै रोजी २०२४ या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या कालावधीत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात येत आहे.

  मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७,७४९८०६७८३५,जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८६१४ /८२७५७७६२१३ पोलीस टोल फ्री हेल्पलाईन ११२ जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग (०२३६२) २२८९०१ महावितरण, सिंधुदुर्ग नियंत्रण कक्ष

७८७५७६५०१९ दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२५६५१८ सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२७२०२८

वेंगुर्ला  तालुका नियंत्रण कक्ष (०२३६६) २६२०५३ कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६२)२२२५२५ मालवण तालुका नियंत्रण कक्ष(०२३६५)२५२०४५,१० कणकवली तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३२०२५

देवगड तालुका नियंत्रण कक्ष (०२३६४) २६२२०४ वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष

(०२३६७)२३७२३९, हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करावा असे आवाहन ही जिल्हा प्रशासनाने केले आहे.