कणकवली तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस ची भरती जाहीर

रिक्त ४७ पदे भरण्यासाठी प्रकल्प अधिकारी 'अमोल पाटील याचे आवाहन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 02, 2023 15:54 PM
views 1213  views

कणकवली : कणकवली एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय प्रकल्प कणकवली अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांतील रिक्त पाच अंगणवाडीसेविका, तीन मिनी अंगणवाडीसेविका व अंगणवाडी मदतनीस अशी ३९ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २ ते १६ मार्च या कालावधीत अर्ज मागविण्यात आहेत.

सदर पदासाठी अर्ज नमुना व अर्जासोबत सादर करावयाची इतर आवश्यक कागदपत्रे यांचा नमुना संबंधित ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी पात्र व इच्छुक महिलांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी 'अमोल पाटील यांनी केले आहे. "यात अंगणवाडीसेविकांमध्ये कासार्डे वाळूखण, तळेरे रघुचीवाडी, कासार्डे ब्राह्मणवाडी, कुरंगवणे पश्चिम व बेलें या अंगणवाडींचा समावेश आहे. मिनी अंगणवाडी सेविकामध्ये ओझरम माळवाडी, तोंडवली क्र. १. कुरंगवणे बौद्धवाडी तर अंगणवाडी मदतनीससाठी कासार्डे वाळूखण, तोंडवली बोभाटेवाडी, कुरंगवणे पश्चिम, बेर्ले, शेर्पे, वारगाव क्र. ३, खारेपाटण क्र. १, बंदरगाव, फोंडा माळवाडी, फोंडा सुतारवाडी, फोंडा हवेलीनगर, फोंडा बौद्धवाडी, घोणसरी क्र. ४, लोरे गुरववाडी, हरकुळ खुर्द क्र. १, हरकुळ तेलीवाडी, भटवाडी, कलमठ बौद्धवाडी, कलमठ गुरववाडी, कलमठ लांजेवाडी, दिगवळे क्र. १, नाटळ कावळेटेंब, भिरंवडे परतकाम, कुंभवडे क्र. १, कुंभवडे क्र. २, सांगवे गावकरवाडी, नाटळ थोरलेमोहूळ, सावडाव क्र. १, सावडाव डगरेवाडी, करुळ क्र. १, हुंबरट उर्दू बोर्डवे क्र. १, हळवल परबवाडी, हळवल गुरववाडी, कळसुली हुंबरणे, कळसुली क्र. १, जानवली क्र. १, ओझरम प. व बिडवाडी मुडेडोंगर यांचा समावेश आहे