३० ऑगस्ट पर्यंत पीक पाहणी नोंद करा : तहसीलदार रमेश पवार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 26, 2023 17:53 PM
views 454  views

देवगड : देवगड तालुक्यातील शेतकरी खातेदारांना कळविण्यात येते की ज्यांची पीक पाणी करायची राहिली असेल त्या शेतकऱ्यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पीक पाहणी मोबाईलवर करावी. न केल्यास  पीक विमा मिळण्यास अडचण, पीएम किसान योजना, सोसायटी किंवा बँक कर्ज मिळण्यासाठी अडचण, अतिवृष्टी नुकसान भरपाई, गारपीट नुकसान भरपाई, कांदा अनुदान वरील प्रमाणे अनेक शासकीय योजनेसाठी पीक पाहणी आवश्यक आहे.

न केल्यास जमीन पडीक म्हणून नोंद लागेल म्हणून  नुकसान होऊ नये याकरिता ताबडतोब पीक पाहणी लावून घ्यावी. असे आवाहन देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.