'देवावतारी बाळूमामा' ला रेकॉर्डब्रेक गर्दी !

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 15:57 PM
views 451  views

सावंतवाडी :  हनुमान श्री विठोबा भक्तगण पुरस्कृत अभिनय सम्राट नितीन आसयेकर  प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगाव यांचा देवावतारी बाळू मामांच्या जीवनावर आधारित 'श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा' हा नाट्यप्रयोग काल २५ डिसेंबरला श्री देव हनुमान रंगमंच आरोस, दांडेली इथं झाला.  नाट्यप्रयोग पाहण्यासाठी नाट्यरसिकांनी तुफान गर्दी केली होती. हा नाट्यप्रयोग सुरु असेपर्यंत सर्व नाट्यरसिक या नाटकाचा आनंद घेत बक्षिसांचा वर्षाव करत होते. या ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोगात नितीन आसयेकर, संतोष चाळके, सुशील रेडकर, रमेश खोत, श्रीधर सावंत, मंगेश साटम, संतोष नाईक, दीप निर्गुण, देवेश कुडव, साहिल तळकटकर हे कलाकार होते. तर हार्मोनियम सिद्धेश राऊळ,पखवाज प्रकाश मेस्त्री, झांज कुणाल परब यांनी साथसंगत केली.