हेल्प ग्रुप फाउंडेशनच्या शिबिरात विक्रमी रक्तदान

Edited by: दिपेश परब
Published on: January 29, 2024 13:40 PM
views 65  views

वेंगुर्ले :  हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणीच्या वतीने ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र शाळा सुरंगपाणी वायंगणी येथे तालुकास्तरीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास एकाच वेळी ८० रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला एसटी आगाराचे आगार प्रमुख राहुल कुंभार, माजी सरपंच शामसुंदर मुणंनकर, खानोली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रशांत खानोलकर, केंद्र शाळा सुरंगपाणी शाळेचे मुख्याध्यापिका श्यामल मांजरेकर उपस्थित होते. यावेळी दाभोली शाळा नं. २ शिक्षक प्रशांत चिपकर याना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शामल मांजरेकर यांचाही सत्कार करण्यात आला. या रक्तदानासाठी सावंतवाडी आरोग्य विभाग ब्लड बँक व एसएसपीएम हॉस्पिटल पडवे या ब्लड बँकचे सहकार्य लाभले. तसेच उपकेंद्र आडेली यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी हे ग्रुपचे उपाध्यक्ष हर्षद साळगावकर, प्रवीण राजापूरकर, महेंद्र सातार्डेकर, शेखर तोरस्कर, उल्हास कामत, नारायण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, सिद्धेश कोचरेकर, जाई नाईक, सिद्धी गावडे, प्रेरणा राजापूरकर,भिकाजी गावडे, प्रसाद पेडणेकर उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक ग्रुपचे अध्यक्ष सुमन कामत यांनी केले तर सुत्र संचालन सुनिल नाईक यानी केले.