
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग मधील सुप्रसिद्ध तबलावादक श्री भावेश राणे यांनी अ.भा.गांधर्व महाविद्यालयाच्या तबला विशारद परीक्षे मध्ये प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे. आपले आजोबा ज्येष्ठ दशावतार कलाकार कै.श्री दत्तात्रय राणे यांच्या पासून त्यांना कलेचा वारसा लाभला आहे... वडिल श्री प्रमोद राणे हे जेष्ठ हार्मोनियम वादक आहेत.भजन तसेच अनेक संगीत नाटकांना त्यांनी संगीत दिलेले आहे, तसेच त्या काळात अनेक भजन स्पर्धा मध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम केलय.या सर्वांमुळे त्यांना संगीताची आवड निर्माण झाली.
त्यांचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण वडील प्रमोद राणे यांच्या जवळ झाले. त्या नंतरअण्णा मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.. सावंतवाडी येथीलनिलेश मेस्त्री तसेच श्री श्रीपाद भागवत यांच्या जवळ अनेक वर्षं त्यांनी शिक्षण घेतले. आता ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार पं.श्री मयंक बेडेकर (गोवा) यांच्या जवळ पुढील शिक्षण घेत आहे.
यामध्ये त्यांना संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री, पखवाज वादक अमित रगजी, तबला वादक प्रसाद जोशी यांचे , कलाक्षेत्रातील अनेक जणांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. घरातच संगीताचा वारसा असल्याने त्यांनी वयाच्या ५व्या वर्षा पासून वादन करण्यास सुरुवात केली.ते गेली २५ वर्षे कला क्षेत्रात वादन करत आहेत.संगीत क्षेत्रात अगदी कमी वयापासून त्यांनी शास्त्रीय संगीत,भजन स्पर्धा, दशावतार, डबलबारी ,तबला एकल वादन अशा अनेक क्षेत्रात आपले नावलौकिक मिळविले आहे.. अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट वादक म्हणून पारीतोषीक मिळविली आहेत. सिंधुदुर्ग,गोवा, पुणे येथील अनेक लौकिक प्राप्त दिग्गज कलाकारांना त्यांनी साथसंगत केली आहे.
आज ते अनेक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. आपल्या यशाचे सर्व श्रेय त्यांनीआपले आईवडील आणि गुरूंना दिले आहे.