
वेंगुर्ला : तालुक्यातील मूळ रेडी येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे राहणाऱ्या आयुष जितेंद्र राऊळ याची मिस्टर इंडिया २०२५ मेल मॉडेल चॅम्पियनशिप साठी टॉप फायनलिस्ट म्हणून निवड झाली आहे. येत्या ३० मे रोजी अंतिम स्पर्धा होणार असून आयुषला पाठिंबा देण्याचे आवाहन जि प माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.
रेडी येथे प्रतिवर्षी होणाऱ्या सप्ताह उत्सव मध्ये आयुषचे वडील जितेंद्र राऊळ गेली ४० वर्षे आपली कला सादर करतात. तर आयुष गेली ४ वर्षे या सप्ताहात विविध कलाकृती सादर करून आपली कला सादर करतो. गतवर्षी त्याने या सप्ताहात केलेली श्री मारुतीरायची भुमीका आकर्षक ठरली होती.