रेडी जिल्हा परिषद विभागीय मतदार संघाची कमिटी जाहीर

दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्राचं वितरण
Edited by: ब्युरो
Published on: August 10, 2023 12:12 PM
views 249  views

वेंगुर्ला : रेडी जिल्हा परिषद मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेसची बैठक 9 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच, रेडी जिल्हा परिषद मतदार संघ काँग्रेसच्या माध्यमातून व  सिद्धेश परब यांच्या प्रयत्नातून शिरोड्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले. यात अंकुश अर्जुन गावडे राहणार देऊळवाडी, पूजा मारुती शहापूरकर, विगीता मारुती शहापूरकर राहणार मोरजकरवडी यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच रेडी जिल्हा परिषद विभागीय मतदार संघाची कमिटी जाहीर करण्यात आली व सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शिरोडा बेसिक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विशाल गावडे तर उपाध्यक्षपदी विठ्ठल परब. युवक काँग्रेस अध्यक्षपदी जगन्नाथ गावडे तर उपाध्यक्षपदी गौरव परब व  ज्ञानोबा नार्वेकर, रेडी पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रकाश पडवळ, शिरोडा पंचायत समिती विभागीय अध्यक्षपदी आनंद मसुरकर, रेडी जिल्हा परिषद विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजीत राणे, रेडी जिल्हा परिषद विभागीय युवक काँग्रेस अध्यक्ष पदी प्रथमेश परब, शिरोडा सेवादल अध्यक्ष अंकुश शेट्ये, आरवली युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश हूनारी, शिरोडा महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री गोडकर. तर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्रीकृष्णा आचरेकर व सरचिटणीस पदी मयूर आरोलकर यांची नियुक्ती करण्यात आली. 

सदर बैठकीस वेंगुर्ला तालुका माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, माजी उपसभापती पंचायत समिती वेंगुर्ला तालुका सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सिद्धेश परब, माजी पंचायत समिती सदस्य चित्रा कण्याळकर, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी , ग्रा. प सदस्या अनिस्का आनंद गोडकर, ग्रा.प सदस्य प्रथमेश परब, माजी उपसरपंच मयूर आरोलकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.