
वेंगुर्ला : रेडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत रेडी विकास आघाडीच्या प्रचाराला श्री देवी माऊलीची ओटी भरून दणक्यात सुरुवात करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत रेडी विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुनील बापू सातजी हे रिंगणात असून प्रभाग १ मधून वंदना विनोद कांबळी, प्रभाग २ मधून अजित उत्तम पडवळ, प्रभाग ३ मधून तुळशीदास पंढरीनाथ भगत व शमिका सहदेव नाईक, प्रभाग ४ मधून श्रीकांत चंद्रकांत राऊळ व मिलन संदीप म्हापणकर हे उमेदवार रिंगणात आहेत.