
वेंगुर्ला : नवसाला पावणारा सुप्रसिद्ध रेडी गणपतीचा ४९ वा वाढदिवस सोहळा शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ साजरा होतोय. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
सकाळी : ०६.०० वा. अभिषेक, सकाळी : ०८.०० वा. श्री सत्यविनायक महापुजा, दुपारी : १२.३० वा. आरती, दुपारी :०१.०० ते ०४.०० वा. पर्यत महाप्रसाद, सायं : ०४.०० ते ०८:०० वा. स्थानिक भजने, रात्री :०८.०० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे, दशावतारी नाटक असे भरगच्च कार्यक्रम होतील. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचं आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी यांनी केलंय.
अधिक माहितीसाठी संपर्क श्री गजानन देवस्थान रेडी नागोळेवाडी, श्री कृष्णाजी श्रीनिवास कामत ८८०६६०५६६९, श्री विनायक सदानंद कांबळी ९४२३१६६५४५, श्री संदेश सदानंद कांबळी ९४२२९७६७७६.