
रायगड : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे.