रवींद्र यादव यांचं निधन

Edited by:
Published on: February 22, 2025 16:21 PM
views 273  views

देवगड : देवगड तालुका नाभिक संघटनेचे कार्यकर्ते व तळेबाजार येथील सलून व्यवसायिक रवींद्र यशवंत यादव (५८, रा. टेंबवली - देवगड) यांचे अल्पशा आजाराने १८ फेब्रु. रोजी देवगड येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, १ विवाहित मुली, ३ भाऊ,बहिणी वहिंनी, पुतणे - पुतण्या असा परिवार आहे. टेंबवली हायस्कूलचे कर्मचारी राजेंद्र यादव व देवगड तालुका महिला नाभिक संघटना उपाध्यक्षा श्रध्दा चव्हाण (शिरगांव) यांचे ते मोठे बंधु तर देवगड तालुका महिला नाभिक संघटना अध्यक्षा  मयुरी यादव यांचे दिर होत.