आंगणेवाडीचा आशीर्वाद घेऊन रविंद्र चव्हाण करणार प्रचाराचा शुभारंभ

Edited by:
Published on: October 20, 2024 14:04 PM
views 116  views

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र चव्हाण उद्या सोमवार २१ ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाकरता येणार आहेत आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे आशिर्वाद घेतल्यानंतर ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील रविंद्र चव्हाण आपल्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये करणार असून आपल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्यापासून होणार आहे.