
दोडामार्ग : रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तळकट सोसायटी येथे फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे प्रभारी माजी तालुकाध्यक्ष नाना देसाई, शक्ती केंद्रप्रमुख तथा कोलझर सोसायटीचे माजी चेअरमन संजय गवस, तळकट सोसायटीचे चेअरमन अंकुश वेटे, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, उपसरपंच रमाकांत गवस, कळणे सरपंच अजित देसाई, युवा तालुका उपाध्यक्ष दिलखुश देसाई, तळकट बुथ अध्यक्ष चंद्रहास राऊळ, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत राऊळ, समीर गवस, कुंब्रल बुथ अध्यक्ष प्रदीप सावंत, झोळंबे ग्रामपंचायत सदस्य मंगेश नाटेकर, दत्ता जोशी, गोविंद देसाई, दत्तप्रसाद सावंत, प्रभाकर गवस, प्रथमेश सावंत, सिद्धेश देसाई. इत्यादी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.