
सावंतवाडी : भाजप या पक्षात कोणी दादा किंवा भाई आगेबढो अशा घोषणा न देता केवळ भारतीय जनता पार्टी आगे बढो अशा घोषणा दिल्या पाहिजेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कमळा शिवाय होऊ नये असे विधान भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल. सिंधुदुर्गात भाजपला शिवसेनेन पाडलेल्या खिंडारानंतर श्री. चव्हाणांच विधान चर्चेच ठरलं.
भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आले असता त्यांच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कमळाशिवाय होऊ देऊ नका. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिक्षत भाजपा असली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी जसा पूर्वी आपल्या सोबत होतो त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने आपल्यासोबत असेन, त्यामुळे कोणीही चिंता करू नका. आपल्या सारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर ज्याप्रमाणे लोकसभा, विधानसभेत कोकणात यश मिळाले. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकामध्ये केवळ कमळच जिंकून येईल असे मी आपल्यावतीने बोलतो असं माजी मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, रवि मडगांवकर, पंकज पेडणेकर, मानसी धुरी, प्रियांका गावडे, गुरुनाथ पेडणेकर, संदीप मेस्त्री, मनोज नाईक, महेश सारंग, मंदार कल्याणकर, महेश धुरी, जावेद खतीब, बाळू सावंत आदी सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.