सिंधुदुर्गच्या आरोग्याचं रविंद्र चव्हाणांनी स्वीकारलं पालकत्व !

डॉक्टरांची कमतरता भरून काढणार, शासनही प्रयत्नशील : पालकमंत्री रविंद्र चव्हाण
Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 14:12 PM
views 187  views

नागपूर : कोकणसाद LIVE नं सिंधुदुर्गची आरोग्य परिस्थिती समोर आणल्यानंतर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आला. आमदार वैभव नाईक, सत्ताधारी आमदार नितेश राणे, मंत्री दीपक केसरकर यांच्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही  याची गंभीर दखल घेत येणाऱ्या काही दिवसात चांगल्या आरोग्य सुविधा सिंधुदुर्गत उपलब्ध होतील असा विश्वास तमाम सिंधुदुर्गवासियांना दिला आहे. नागपूर अधिवेशना दरम्यान रवींद्र चव्हाण यांच्याशी कोकणसाद LIVE चे प्रतिनिधी दीपेश परब यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 


 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालयांसह इतर रूग्णालयातील डॉक्टर व त्यांची असणारी कमतरता हा सर्वात मोठा असणारा विषय जिल्ह्यात आहे. औषध पुरवठा व उपलब्धतेबाबत जिल्हा नियोजनमधून औषध उपलब्ध करून देण आवश्यक होत त्याप्रमाणे औषध उपलब्ध आहेत.  डॉक्टरशी कमतरता भरून काढण्यासाठी आमचा व शासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. शासकीय रूग्णालयात डॉक्टरची कमतरता हा सरकार समोरचा मोठा प्रश्न आहे. याची मलाही कल्पना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल आहे. पुर्वीच जिल्हा रूग्णालय त्याला जोडण्यात आले आहे. त्यामुळे तिथल्या गैरसोयीबाबत बैठका घेऊन त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक उपाययोजना आम्ही करत असतो.


 तर डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगळ्या पद्धतीने टेलीमेडीसीनच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा आपण उभारत आहेत. त्यात यशही येत आहे. टेलीमेडीसींनच्या माध्यमातून रूग्णांची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले जातात. चांगल्या पद्धतीने ही यंत्रणा कार्यरत आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होण हे देखील आवश्यक आहे. तर येणाऱ्या काही दिवसात चांगल्या आरोग्य सुविधा सिंधुदुर्गला उपलब्ध होतील याची मला खात्री आहे असा दावा करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गच्या हेल्दी आरोग्यासाठीचा विश्वास सिंधुदुर्गकरांना दिला आहे.