मोती तलावकाठी मंत्री रविंद्र चव्हाणांची कार्यकर्त्यांसोबत 'चाय पे चर्चा'

Edited by: विनायक गांवस
Published on: June 04, 2023 21:02 PM
views 146  views

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण नेहमी 'कॉमन पीपल' राहणीमानास प्राधान्य देतात. आमदार ते कॅबिनेट मंत्री अशा प्रदीर्घ प्रवासात त्यांच्या राहणीमानात कोणताही बदल झाला नाही. ना त्यांच्या कुटुंबीयांत. आजही ते सर्वसामान्यांप्रमाणेच समाजात वावरतात. कोणताही बडेजाव न राखता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून मिसळून असतात. याचाच प्रत्यय आज सावंतवाडीत आला. 


जिल्हा दौऱ्यावर असलेले

मंत्री रवींद्र चव्हाण सावंतवाडीत आले असताना त्यांनी मोती तलावाच्या काठावर कार्यकर्त्यांसोबत वेळ दिला. भाजप कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या चहासाठी प्रसिद्ध दुकानात 'चाय पे चर्चा' करत बैठक घेतली. यावेळी शहरातील विविध विकास कामाबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.


 याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, परिक्षीत मांजरेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.