ही शहरं विकासाची नांदी !

पालकमंत्र्यांचा धडाका हा गतिमान विकासाचं मूर्तिमंत उदाहरण : अँड. परिमल नाईक
Edited by: विनायक गांवस
Published on: May 04, 2023 12:20 PM
views 100  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नियोजित नळपाणी योजनेला तसेच मोती तलाव दुरुस्तीसाठी, अग्निशमक बंब व इमारत तसेच शहरातील विविध विकास कामांसाठी कार्यतत्पर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने मंजूर केलेला निधी म्हणजे सावंतवाडी शहराच्या विकासाची नांदीच आहे. सावंतवाडी शहराबरोबर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पालकमंत्री यांचा धडाका हा जिल्ह्यातील सकारात्मक गतिमान विकासाचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी भरीव निधी देण्याचं पालकमंत्र्यांचं अभिवचन आहे अस मत माजी सभापती तथा नगरसेवक 

अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले.