
सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या विकासात खऱ्या अर्थाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे भर पडत असल्याचे मत बंटी पुरोहित यांनी व्यक्त केले आहे. पालकमंत्री पदाच्या केवळ आठ महिन्यांचा कालावधीत त्यांनी सावंतवाडी शहराची गरज ओळखून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ५६ कोटी रुपयांची नळपाणी योजना मंजूर केली आहे.
दरम्यान अग्निशमन यंत्रणेकरिता सुसज्ज इमारतीसाठी ३ कोटी २८ लाख निधी मंजूर केला आहे. तर भाजी मार्केटसाठी १३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शहराच्या विकासासाठी दिलेल्या या निधी बद्दल बंटी पुरोहित यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.