
सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता एम.आय. डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता कुडाळ येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांच्या समस्या या विषयासंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थिती. स्थळ, समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.30 वाजता ओरोस येथून कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथे आगमन व कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, कुडाळ रेल्वेस्थानक जि. सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता एम.आय.डी.सी.विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता कुडाळ येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 5 वाजता सावंतवाडी येथे आगमन व सावंतवाडी तालुक्यातील ग्रामिण भागातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजन साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, बॅ.नाथ पै सभागृह, सावंतवाडी .सायं. 5.30 वाजता मौजे चौकुळ, ता. सावंतवाडी येथील कबुलायातदार गावकर समितीसोबत बैठक. स्थळ बॅ.नाथ पै सभागृह, सावंतवाडी. सायं 6.30 वाजता सावंतवाडी येथून मोपा (गोवा) कडे प्रयाण.