
देवगड : युथ फोरम- देवगड या संस्थेच्यावतीने येथील देवगड तालुक्यातील शेठ म. ग. हायस्कूल येथे युथ फोरम- या संस्थेच्यावतीने येथील गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत रत्नागिरीच्या विलास राहटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना रोख १५ हजार रूपये, व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन उद्योजक शामराव पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.यात महिला स्पर्धकांचा सहभाग लक्षणीय होता.स्पर्धेतील रांगोळींचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी केले आहे.
यावेळी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरणप्रसंगी व्यासपीठावर उद्योजक शामराव पाटील, नगरसेवक संतोष तारी, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्या अनुश्री पारकर, उद्योजक मधुकर नलावडे, प्रमुख पाहुणे म्हणून नील सालेकर, युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर, उपाध्यक्ष प्रणव नलावडे, खजिनदार सागर गावकर, सहसचिव रसिका सारंग, शहर उपाध्यक्ष जितेश मोहिते आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील द्वितीय व -मांकाप्राप्त समीर चांदरकर (मालवण) यांना रोख १२ हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नील साळेकर यांच्या हस्ते, तर तृतीय क्रमांकप्राप्त केदार टेमकर (कुडाळ) यांना रोख दहा हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नगरसेवक संतोष तारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ क्रमांकासाठी प्रशांत सुवर्णा (मुंबई), सुरेश छत्रे (कोल्हापूर), भूमेश नाईक (गोवा) यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उर्वरित सहभागी रांगोळी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आज्ञा कोयंडे यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्पर्धेला रांगोळी कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. एकूण ३० स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. गोवा राज्यासह मुंबई, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, तसेच सिंधुदुर्गातील कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, खारेपाटण, दोडामार्ग अशा विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावर्षी प्रथमच आठ महिला स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.
या रांगोळी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांसमवेत संस्था सचिव अमित पारकर, कार्यकारिणी सदस्य श्रुती माणगांवकर, आकाश सकपाळ, शहर अध्यक्ष ओंकार सारंग, सचिव आज्ञा कोयंडे, सदस्य राधा जगताप, रूद्रा शेट्ये, श्रवण बांदेकर, शुभम महाजन, हर्षित कोयंडे, श्रेयस कडू, सय्यम सोमण, युथ फोरम कॉलेज कमिटीचे अध्यक्ष दीपक जानकर, उपाध्यक्ष पूर्वा चौगुले, सचिव सलोनी कदम, आचल वर्मा, मिली बापर्डेकर आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती. या स्पर्धांचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.तर आभार सहसचिव रसिका सारंग यांनी मानले.










