आंतरविभागीय नाट्य स्पर्धेत रत्‍नागिरीचे ‘किनारा’ प्रथम

Edited by:
Published on: February 24, 2024 14:31 PM
views 68  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५१ व्या आंतर विभागीय नाटय स्पर्धा सन २०२३-२४ चा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच वेंगुर्ले, (जि. सिंधुदुर्ग) केंद्रावर झाला. रा. प. रत्नागिरी विभागाचे "किनारा" हे नाटक आंतरविभागीय नाटयस्पर्धा सन २०२३-२४ वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) केंद्रावर प्राथमिक फेरित प्रथम आले. त्यानंतरच्या नांदेड येथिल अंतिम फेरीत सुद्धा प्रथम विजेते ठरले. 

मोहनदास भरसट, महाव्यवस्थापक, श्रीनिवास जोशी, उपमहाव्यवस्थापक (नियंत्रण समिती क्र.०१) आणि राजेश कोनवडेकर, मुख्य कामगार अधिकारी, रा.प.मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचे प्रमुख उपस्थितीत नंदकुमार पाटील, मराठी नाटक, चित्रपट, मालिका अभिनेता यांच्या शुभहस्ते प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, विलास चौगुले, कामगार अधिकारी, राजेश मयेकर, नाटय दिग्दर्शक आणि सर्व नाटय संघ कलाकार कर्मचारी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.