
मंडणगड : रत्नागिरी जिल्हा काँग्रेस (आय) कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या उपस्थितीत मंडणगड तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली या प्रसंगी जिल्हाध्यक्षांचे कॉग्रेस कार्कर्त्यांनी मंडणगड तालुक्यात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
बैठकीत मंडणगड तालुक्यातील काँग्रेस पक्षाची सध्याची भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला तालुक्यातील प्रमुख तसेच निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
बैठकीस संतोष मांढरे, जमीर माखजनकर, महिला अध्यक्षा दिपांजली धाडवे, कादीर बुरोंडकर, सिकंदर बुरुड, अख्तर उकये, शकील बुरुड, फैसल माखजनकर, सैफ पाल आदींसह मंडणगड तालुका सेवादल प्रमुख मोतीराम चव्हाण, चिपळूणचे कैसर देसाई, गुहागरचे माजी अध्यक्ष रियाज ठाकूर, रत्नागिरी जिल्हा सेवादल अध्यक्ष टी. डी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मंडणगड तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी जमीर माखजनकर व कादीर बुरोंडकर ही दोन नावे चर्चेत असून, योग्य विचारांती लवकरच नव्या अध्यक्षपदी नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारीसंदर्भातही मार्गदर्शन केले. पुढील दोन दिवसांत चिपळूण येथे जिल्हा स्तरावरील बैठक प्रदेश निरीक्षकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.










