
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान महाविद्यायातील देव्हारे येथे आयोजित झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात सुयश संपदान केले.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक मैदानी खेळामध्ये सैफ हनीफ चिपोळकर - लांब उडी - प्रथम क्रमांक, साई उदय पाटील - लांब उडी - व्दितीय क्रमांक, रक्षण रोहित सोंडकर - पाच किलोमीटर चालणे - प्रथम क्रमांक, यश विश्वास पलांडे - पाच किलोमिटर चालणे - व्दितीय क्र्रमांक, तर मानसी महेश जगताप - गोळाफक (मुली) - गोळाफेक तृतीय क्रमांक संपदान केला. या सर्व विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर सुयश प्राप्त केले असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. प्र.प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये योग्य मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक प्रा. साई पवार, प्रा. संजना दिवेकर यांनी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री.श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सर्व संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभये क्रीडा विभागप्रमुख प्रा. साई पवार, प्रा. अशोक कंठाळे, प्रा.संजना दिवेकर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.










