
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरीचे माजी शहर अध्यक्ष श्री अद्वैत सतीश कुलकर्णी हे भारतीय जनता पार्टी पक्षा मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मनसेचा अजून एक शिलेदार पक्षाची साथ सोडणार आहे. दरम्यान, अद्वैत कुलकर्णी ह्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते काही काळ पक्षाच्या कामापासून लांब होते.. पण आता ते भाजपा मध्ये प्रवेश करतील अशी खात्रीलायक माहिती आहे..
उद्या २३ सप्टेंबर २०२५ ला भारतीय जनता पार्टीच्या नरीमन पॉईंट येथील कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आणि वैभव खेडेकर आणि अविनाश सौंदळकर व असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत ते प्रवेश करतील.
दरम्यान, अद्वैत कुलकर्णी ह्यांनी मनसे मध्ये असताना शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती, त्यांच्या काळात मनसेने शहरातील समस्यांबाबत अनेक आंदोलन देखील केली होती. त्यांच्या शहर अध्यक्ष च्या काळात त्यांनी पक्षाची ठाम भूमिका बजावून विरोधकांना घाम फोडला होता. एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते. पण काही व्ययक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला होता.. आता पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रिय होणार आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.










