
वेळणेश्वर : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रकल्प 2025 या आंतर महाविद्यालयीन प्रोजेक्ट स्पर्धेची थाटात सांगता झाली. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 30 ग्रुप्सनी उत्साहाने आपला सहभाग नोंदवला होता. नेहमीच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आपल्या अंगातील कलागुण दाखवून देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय कायमच अग्रेसर राहिलेलं आहे..
अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन आणि गोडी निर्माण व्हावी याकरिता त्यांना काहीतरी प्रात्यक्षिक मॉडेल बनवून ते एक्जीबिशन स्वरूपात सादर करयासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता..
ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये पार पडली. प्रथम टप्प्यामध्ये विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन त्या त्या महाविद्यालयांमधून दोन किंवा तीन ग्रुप्स विजेते म्हणून निवडण्यात आले. आणि नंतर अशा विविध महाविद्यालयांमधून निवडण्यात आलेले सुमारे 30 विजेते ग्रुप्स फायनल राऊंडसाठी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आले.. रत्नागिरी मधील पटवर्धन कॉलेज, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज आंबडस, गद्रे जुनियर कॉलेज, चिपळूण, खंडाळा जुनिअर कॉलेज, जिंदाल जुनियर कॉलेज जयगड, गुहागर येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, नवभारत ज्युनियर कॉलेज खेड या आणि अशा अनेक नामवंत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी अतिशय उत्साहाने हजेरी लावली..
फायनल राऊंड ची स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. आणि या स्पर्धेमध्ये खालील तीन गटांनी विजेतेपद पटकावले.. प्रथम क्रमांक जिंदाल विद्यामंदिर, प्रथमेश ठाकूर आणि ग्रुप यांनी पटकवला.. Artificial intelligence सुरक्षितता या विषयावर त्यांनी प्रोजेक्ट बनवला होता..
द्वितीय क्रमांक गुहागर येथील श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर या महाविद्यालयाच्या ग्रुपने पटकवला..तृतीय क्रमांक खेडच्या नवभारत ज्युनियर कॉलेजच्या ग्रुपने पटकवला.. त्यांनी प्लास्टिक वेंडर मशीन हा प्रोजेक्ट बनवला होता..
प्रथम क्रमांक रुपये पाच हजार रोख आणि प्रशस्तीपत्रक तसेच द्वितीय क्रमांकास रुपये तीन हजार रोख आणि प्रशस्तीपत्रक व तृतीय क्रमांकास रुपये दोन हजार रोग व प्रशस्तीपत्रक अशाप्रकारे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला..
तसेच जिंदाल विद्या मंदिराचा आणखी एक ग्रुप आणि पावस येथील राबिया शेख अहमद नाखवा ज्युनियर कॉलेजच्या 'वॉटर क्लिनिंग सिस्टीम' हा प्रोजेक्ट सादर करणारा ग्रुप अशा दोन ग्रुप्सना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
प्रस्तुत उपक्रमाच्या यशस्वीते करिता विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अविनाश पवार तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा प्रकल्प इव्हेंटचे समन्वयक डॉ. गणेश दिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.










