
मंडणगड : तालुका स्तरीय पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धा देव्हारे हायस्कूल च्या क्रीडांगणावर १३ सप्टेंबर २०२५ ला घेण्यात आल्या. यावेळी श्रीपाद ट्रैलोक्य पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय उमरोली, ता. मंडणगड या विद्यालयाच्या 17 वर्ष वयोगट मुले व मुली या दोन्ही संघांनी आपल्या खेळाचे सुंदर प्रदर्शन करून अटी - तटीच्या सामन्यात विजय मिळवीत प्रथम क्रमांक मिळवीत पुन्हा एकदा उमरोली हायस्कूल चा दबदबा निर्माण केला.
याकामी क्रीडा शिक्षक वसावे, राणे सर यांचे योगदान लाभले. शिवाय मुख्याध्यापक माने, सांस्कृतिक प्रमुख पवार , लिपिक शशिकांत बोर्ले, शिपाई शेडगे यांचेदेखील सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी संस्था संचालक रूपा देवकर , संस्था सचिव ऍड. धनंजय करमरकर, अध्यक्ष संदेश स्वामी पालक अनिलभ जगताप पालक संघ माजी उपाध्यक्ष भूपेंद्र बोर्ले, शाळेचे माजी विध्यार्थी, रजनीकांत बैकर, गाव अध्यक्ष निलेश मोरे, सुधीर हुंबरे, शैलेश वाजे तसेच संपूर्ण पंचक्रोशी मधून यशस्वी विध्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. दोन्ही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.