
मंडणगड : तालुक्यातील सडे ग्रामपंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्षपदी गावातील युवा सामाजीक कार्यकर्ते सूरज लक्ष्मण नाविलकर वय-३० यांची नुकतीच बिनविरोध निवड झालीआहे. ग्रामपंचायतीचे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या बिनविरोधक निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले
ग्रामपंचायत सडे, अंर्तगत सडे गावठाण, मानेवाडी, पवारवाडी, जाधववाडी, सडे बुद्धवाडी यांचा समावेश होतो सभेस ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीबद्दल श्री नाविलकर यांते तालुक्यात अभिनंदन होत आहे.










