
मंडणगड : डीजे व डॉल्बी साऊंडचे जमान्यात गौरी गणेश जाखडी नृत्य या पांरपारीक लोककलेची जपणूक करत विविध पुरस्कार मिळवणाऱ्या जय हनुमान नाच मंडळ मुमूर्शी करंजमाळ जिल्हा रायगड येथील नाच मंडळाने 5 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील कुणबी भवन येथील सार्वजनीक गणेशोत्सवाचे निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात आपली कला सादर करुन कला रसिक प्रेक्षकांची मनोरंजन केले. कोकणात दुर्मिळ होत असलेल्या या कलेची वयाची पंच्याहत्तरी पुर्ण केलेल्या वयोवृध्द तरुणांनी केवळ ढोलकी व चाळ या दोन वाद्यांतून निर्माण होणाऱ्या सुरु ताल व लय यावर सादर केलेली कला तरुणांना लाजवणारी होती तसेच पुर्वाजांनी जीवापाड जपलेल्या या कलेची जोपसना करावी असा संदेश देणारी होती.
ढोलकीच्या तालावर सादर केलेल्या शिस्तबध्द विविध चाली व संभूराजू घरण्यातले तुरेवाले शाहीर सिताराम होडबे यांचे सुरेल गायन व त्यास तितकीच सुंदर कोरस साथ हे या कार्यक्रमाचे वैशीष्ठ्य ठरले. पांरपारीक गण गौळण अभंगाबरोबरच शिवबा तुम्हा विन रायगड सुना, देशभक्तीपर भ्रष्टचार मुक्तीचे गीत सादर करीत दोन तासांहून अधिक वेळ कार्यक्रमाचे सादरीकरण करीत रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली कार्यक्रमास माजी सभापती भाई पोस्टुरे, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश घडवले, मनोग घागरुम, मुरलीधर बैकर, रघूनाथ पोस्टुरे, सुभाष सापटे, प्रकाश शिगवण, विजय ऐनेकर, सचिन माळी, नरेश बैकर, अनिल रटाटे, विश्वास रटाटे, सुनील आईनकर, महादेव माळी, अरुण नाकती प्रशांत नाकती, अभय पिचुर्ले, सुरेश पोस्टुरे,सतिष दिवेकर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरासंह कलारसिक प्रेक्षकांनी मोठी संख्येने उपस्थित दाखवली. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन समिर येलवे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.










