
मंडणगड : मंडणगड शहरात उभ्या रहात असलेल्या तालुक्याचे कनिष्ठ न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची 12 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा रत्नागिरी जिल्हा न्यालयालयाचे पालक न्यायमुर्ती श्री. माधव जामदार यांनी पाहणी केली. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.एस. गोसावी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधक अदिती कदम, मंडणगड कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायमुर्ती श्रीमती अमृता जोशी, मुंबई उच्च न्यायालयाचे उपनिबंधक ज्ञानेश्वर मोरे, बार कांन्सील महाराष्ट्र गोवाचे सदस्य अँड. संग्राम देसाई, बार असोसिएशन मंडणगडचे अध्यक्ष अँड. मिलींद लोखंडे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता एस.एन. राजभोज, अधिक्षक अभियंता एम.एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एम.एम. रामसे, उपअभियंता मंडणगड एम.व्ही. वस्ते, स्थापत्य अभियंता सी.बी.एकरे, बांधकाम ठेकेदार संदीप पाटील, तहसिलदार अक्षय ढाकणे, मुध्याधिकारी अभिजीत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
8 ऑक्टोंबर 2023 रोजी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायलायाचे सर न्यायाधीश भुषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती माधव जामदार, उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या मुख्य उपस्थितीत न्यायालयाचे नवीन इमारतीचे भुमीपूजन व तात्पुरत्या स्वरुपातील जागेत न्यायालयाचे नैमीत्तीक कामकाजास सुरुवात करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाचे नव्या इमारतीचे निर्मीतीचे कामाने गती घेतली आहे. नियोजीत वेळेत इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन नव्या इमारतीत न्यायालयाचे कामकाज सुरु करण्याचे लक्ष शासन व न्यायालयाने निर्धारीत केलेले आहे. त्यामुळे सार्वजनीक बांधकाम विभागाचे माध्यमातून सुरु असलेल्या इमारतीचे कामाची जिल्हा न्यायालयाचे माध्यमातून वेळोवेळी पाहणी करुन कामातील प्रगतीचा आढावा संबंधीत यंत्रणेकडून घेतला जात आहे. याचबरोबर कामात आवश्यक बदल व सुचनाही संबंधीत यंत्रणेस दिल्या जात आहेत. दरम्यान (12) रोजी इमारतीचे कामकाजाची पाहणी केल्यावर न्यायालयाचे इमारतीचे परिरसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीचे निर्मीतीचे कामासही गती देण्याच्या सुचना संबंधीतांकडून बांधकाम विभागास देण्यात आल्या. व नियोजीत जागेची पाहणीही केली. यानंतर मंडणगड नगरपंचायत येथे व्ही.सी. द्वारे न्यायालयाचे इमारतीचे कामकाजाबाबत माहीती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन कायदा व न्याय विभागाचे कायदेशीर सल्लागार विलास गायकवाड, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, सार्वजनीक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सर जे.जे. आर्किटेक्टर महाविद्यालय मुंबईचे निबंधक शशिकांत काकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशी संबंधीत असलेले दिल्ली येथील जतिन कुमार यांनी कामाचे प्रगतीचा आढावा घेत चर्चा केली.