
रत्नागिरी : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण संकुलात रथसप्तमी तसेच जागतिक सूर्यनमस्कार दिन अनेक सूर्यनमस्कार घालून उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाची सुरुवात श्री सूर्यदेव यांच्या प्रतिमेस ला शाळेचे उपमुख्याध्यापक श्री संजय बनसोडे व शाळेची माजी विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय योग पटू कुमारी आर्या उदय तांबे यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .या कार्यक्रमात शाळेचे सर्व विद्यार्थ्यांनी सहभागीझाले होते .गुरुदक्षिणा सभागृहात टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. क्रीडा प्रमुख समीर कालेकर सर यांनी प्रास्ताविकातून सूर्यनमस्काराचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे शाळेची माती विद्यार्थिनी कुमारी आर्या उदय तांबे यांनी नियमित सूर्यनमस्कार घातल्याने शरीरात होणारे बदल विद्यार्थ्यांना सांगितले सूर्यनमस्कार हा अष्टांग व्यायाम आहे आणि त्याची सवय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून लागणे गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून दिले .त्यांनी स्वतः प्रात्यक्ष करून विद्यार्थ्यांकडून दहा दहा सूर्यनमस्कार घालून घेतले आणि दररोज सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित अदावडे सरांनी केले. हा कार्यक्रम करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.