दुर्मिळ O (-) निगेटिव्हचं गिरीष सावंत यांनी केलं रक्तदान

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 14:36 PM
views 127  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या निकीता पडवळ या रूग्णाला ऑपरेशन दरम्यान O - निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. तेव्हा गिरीष सावंत, माजगाव यांनी तर ठाकुर या महिला रूग्णाला आवश्यकता असताना उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.