भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी महेश रावराणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 13:57 PM
views 274  views

वैभववाडी : भाजपा सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी तालुक्यातील कुसूर येथील महेश रावराणे यांची निवड झाली.जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. रावराणे हे गेली अनेक वर्षे भाजपचे काम करतात.भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.भाजपच्या युवा मोर्चा संघटनेत जिल्हा व तालुका पातळीवर देखील काम केले आहे.युवा मोर्चाच्या नव्याने झालेल्या जिल्हा कार्यकारिणीत त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.या निवडीनंतर बोलताना श्री.रावराणे म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडेन.तालुक्यासह जिल्ह्यातील युवकांसाठी काम करेन असा विश्वास व्यक्त केला.