
सावंतवाडी : शिमगोत्सव विविधांगी पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सावंतवाडी शहरात आज पाच दिवसांचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. रंगपंचमी निमित्ताने तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डीजेचा, ढोल ताशाच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. कोरोनातील दोन वर्षांचा उत्साह व्याजासह वसूल करण्यात आला.
ठिकठिकाणी युवक-युवतींनी रंगपंचमी साजरी करत रंगपंचमीचा आनंद लुटला. नैसर्गिक रंगांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला. जयप्रकाश चौक, सालईवाडा, वैश्यवाडा, चिताराळी, उभाबाजार, माठेवाडा आदी परिसरात मोठा उत्साह पहायला मिळाला. डिजेच्या तालावर थिरकत युवाईन रंगाची उधळण केली.