
वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या (ता.१०) रांगोळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आंनदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यत हे प्रशिक्षण असणार आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी तालुक्यातील ६५ हुन अधिक इच्छुकांनी प्रतिष्ठानकडे नोंदणी केली आहे. या रांगोळी प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थीना तज्ञ प्रशिक्षिका प्रियाली सुरेंद्र कोदे या मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण वर्ग ९ वाजता सुरू होणार आहे. तत्पुर्वी पंधरा मिनिटे प्रशिक्षणार्थीनी सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. प्रशिक्षणार्थीना अल्पोपहार देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग पुर्णत निशुल्क आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी नोंदणी केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी केले आहे.