
दोडामार्ग : निपुण भारत कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोळंबे येथे माता पालकांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मातांनी सहभाग घेतला स्पर्धेमध्ये देशभक्ती या विषयाला अनुसरून रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक- विनंती विजय देसाई , द्वितीय क्रमांक दीक्षा दिलीप घोगळे आणि तृतीय क्रमांक देविका दीपक गवस यांनी प्राप्त केला. माता पालकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशभक्ती जागृत करणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या . सर्व सहभागी स्पर्धकांचे व विजयी स्पर्धकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गवस व मुख्याध्यापक प्रवीण देसाई तसेच शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या माता पालकांना प्रोत्साहन व त्यांच्यातील क्षमतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. माता पालकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, आपला आत्मविश्वास वाढवावा, पालकांमध्ये असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावी या उद्देशाने माता पालक रांगोळी स्पर्धेचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण संतोष गवस व दिनेश जाधव यांनी केले.