
सिंधुदुर्ग : नवरात्र म्हणेज स्त्री शक्तीचा जागर..उत्साहाचा जल्लोषाचा सण...यानिमित्ताने कोकणसाद LIVE घेऊन येतंय तुमच्या तालुक्यात खेळ पैठणीचा. सुंदर पैठणीसह आकर्षक बक्षीस जिंकता येणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE च्यावतीने करण्यात आलंय.
नवरात्रीनिमित्त कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसादच्यावतीने महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' या खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विल्बर्ट प्रोपार्टी प्रायोजित आणि कॅमलिन सहप्रायोजित हा कार्यक्रम होतोय. कोकणातील महिलांना यानिमित्ताने व्यासपीठ मिळणार आहे. नेहमीचं टेंशन, धावपळ बाजूला ठेवून महिलांना थोडासा विरंगुळा मिळणार आहे. मनोरंजन, हटके खेळ यांसह धमाल उडवून दिली जाणार आहे. याशिवाय विजेत्यांना सुंदर पैठणीसह आकर्षक भेटवस्तूंचा वर्षाव होणार आहे.
आम्ही येतोय तुमच्या तालुक्यात...
16 ऑक्टोबर 2023 ला श्रीकृष्ण मंदिर न्यास, जामसंडे देवगड इथं सायं. 4 वा, 17 ऑक्टोबर 2023 ला माजी पं. स. सदस्य सुप्रिया संतोष वालावलकर अणि शासकीय निवासी संकुल मित्र मंडळ, वालावलकर कॉम्प्लेक्स रहिवासी यांच्या सौजन्याने सायं. 7 वा., 18 ऑक्टोबर 2023 ला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उद्योजक विवेकानंद नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सभापती सौ. गौरी पार्सेकर व युवा उद्योजक सुदेश मळीक सहकार्याने पिंपळेश्वर सभागृह दोडामार्ग इथं रात्री. 9 वा., गुरुवार दि. 19 ऑक्टोबर 2023 ला दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडी इथं रात्री 8 वा., शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023 ला शिवसेना नवरात्र उत्सव कनेडी बाजार, कणकवली इथं रात्री 8 वा., रविवारी दि. 22 ऑक्टोबर 2023 ला कणकवली शिवसेना ठाकरे गट नवरात्रोत्सव इथं रात्री 8 वा., रविवारी दि. 22 ऑक्टोबर 2023 ला बाजारपेठ मित्रमंडळ कणकवली इथं सायं. 7 वा., सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 ला माठेवाडा नवरात्रोत्सव मित्रमंडळ इथं सायं. 6. 30 वा., सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 ला दत्तकृपा मित्रमंडळ ओरोस इथं रात्री 9 वा. हा खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे.
त्यामुळे मनोरंजन आणि बक्षिसांची लयलूट करण्यासाठी सज्ज व्हा. तसेच, मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि दै. कोकणसादच्यावतीने करण्यात आलंय.