
वेंगुर्ले : तालुक्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघाती “कार्यकर्ता संवाद मेळावा” अचानक आज सकाळीच रद्द करण्यात आला.आज १३ एप्रिल रोजी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी मतदारसंघ निवडणूक प्रमुख राजन तेली यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते.
आज सकाळी १०: ३० वाजता जि.प. म्हापण शरयु मंगल कार्यालय, पाट, दुपारी १२: ३० वाजता जि.प.आडेली गोगटे मंगल कार्यालय, वेतोरे, त्यानंतर संध्याकाळी ३: ३० वाजता जि.प. उभादांडा सातेरी मंगल कार्यालय अणसूर, तिठा, संध्याकाळी ५:०० वाजता जि.प. तुळस उत्सव मंगल कार्यालय आणि संध्याकाळी ६:३० वाजता जि.प. रेडी मतदार संघाचा मेळावा माऊली मंगल कार्यालय, शिरोडा येथे हे विविध मेळावे होणार होते.पण अचानक हा दौरा का रद्द करण्यात आला याबाबत नेमके कारण समजू शकले नाही.