
मालवण : भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आंबेरी गावात झंझावती प्रचार करण्यात आला. श्री देव सकलेश्र्वर मंदिरात देवाचे आशीर्वाद घेऊन घरोघर प्रचाराला सुरुवात करण्यात आली. आंबेरी गावातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना ८० टक्के मतदान होणार असल्याचे आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच रवींद्र परब, सदस्य कमलेश वाक्कर, गणेश डिचोलकर, बूथ कमिटी अध्यक्ष नीलेश मुसळे, व सर्व ग्रामस्थ प्रचारासाठी उपस्थित होते.