मुंबईत राणे- केसरकर यांची भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: July 17, 2025 16:19 PM
views 177  views

सावंतवाडी : शिवसेना नेते माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची शिवसेनेचे डॅशिंग आमदार निलेश राणे यांनी भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई येथे राणे- केसरकर यांची भेट झाली.

ज्येष्ठ नेते विकास सावंत यांच्या निधनामुळे मतदारसंघातील वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करत असल्याचे दीपक केसरकर यांनी जाहीर केले.‌ आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार निलेश राणे यांनी त्यांची भेट घेतली.

यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा राणेंनी केसरकर यांना दिल्या. तसेच पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, कोचरा सरपंच योगेश तेली आदी उपस्थित होते.