सावंतवाडी : केसरकरांच्या वडीलांचा उद्धार राणेंनी या गांधी चौकात केला. तर केसरकरांनीही राणेंचा उद्धार कसा केला ? हे जनतेला ठाऊक आहे. राणेंना आमदार नाही तर मुंबईच महापौर व्हायचं होतं. ते आमदार होण्यासाठी आम्ही योगदान दिले. राणेंना विरोध असताना त्यांना निवडून आणलं असं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जुन्या शिवसैनिकांनी व्यक्त केले. तसेच दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात केवळ भुलथापा मारल्याचाही आरोप केला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शिवसैनिक गौरीशंकर खोत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, शब्बीर मणियार, मंदार शिरसाट, सुंदर गावडे, प्रभाकर सावंत, शैलैश गवंडळकर, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.
राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह केसरकरांना मुंबईतली हवा घ्यायला पाठवणार आहोत. निवडणूक आली की जनतेला फसवायचे काम केसरकर करत आहेत. राणे आणि केसरकर मिळून भाजप चोरणार आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकांनी सावध रहावं असं आवाहन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केल. माझ्या रेंजमध्ये आल्यावर बघतो असे म्हणणाऱ्या राणेंची रेंज मुंबई मर्यादित करू असंही ते म्हणाले. माजी आमदार राजन तेली म्हणाले, राणेंनी केसरकरांच्या वडीलांचा उद्धार गांधी चौकात केला. तर केसरकरांनीही राणेंचा उद्धार कसा केला हे जनतेला ठाऊक आहे. राणेंच्या मुलानी आम्हाला संपवायची रणनीती केली आहे. जे राणेसमर्थक आहेत त्यांनीही याचा विचार करावा. नारायण राणेंना मुंबईच महापौर व्हायचं होतं. पण, आम्ही त्यांना येथून आमदार होण्यासाठी सांगत पुढाकार घेतला.
शिवसेना नेते गौरिशंकर खोत म्हणाले, राणेंची भाषण ही लोकशाही विरोधी आहेत. धमक्या देताना आपण कोणाला धमक्या देतो याचा विचार देखील त्यांना केला पाहिजे. नारायण राणेंना आमदार करण्यात आमचं योगदान आहे. सगळे विरोधात असताना आम्ही साथ दिली होती. शिवसेनेनं तुम्हाला बीएसटी चेअरमन, मुख्यमंत्री केल. सामान्य शिवसैनिकांनी आमदार केलं. तर केसरकर ढोंगी माणूस आहे. ही निवडणूक विचारांची आहे. घराणेशाहीची विरोधातली ही निवडणूक आहे. गद्दाराना जागा दाखवून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहूया असं आवाहन गौरीशंकर खोत यांनी केल. पक्षीय हीत व दोन मुलांच्या हितासाठी राणेंचा राजन तेली यांना विरोध आहे.
दरम्यान, त्यांनी पक्ष बदलला तर ती निष्ठा. अन् आम्ही बदलला तर ती गद्दारी ? असा सवाल सतिश सावंत यांनी केला. तर जिल्ह्यातील ही घराणेशाहीला नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे स्थान देऊया नको असं आवाहन सतिश सावंत यांनी केलं. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, पंधरा वर्षं केसरकर यांनी अपप्रवृत्तीचा प्रचार केला आहे. दीपक केसरकर हीच मोठी अपप्रवृत्ती आहे. सत्यविजय भिसे प्रकरणात तेलींच नाव गोवण्यात दीपक केसरकर होते याचा मी साक्षीदार आहे.सगळे जेलमध्ये जाणार असं सांगणारे केसरकर एक दिवस जेलमध्ये असतील अस मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर म्हणाले, शिवसेनेचा एकमेव नगरसेवक असताना दीपक केसरकर स्वीकृत नगरसेवक होते. ज्यांनी सभागृहात बसवलं त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून ते नगराध्यक्ष झाले. त्यांना संजीवनी देण्याचे काम त्यावेळी सेनेचे तीन नगरसेवक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजन तेली व नारायण राणेंनी केलं. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तेलींना आम्ही रिक्वेस्ट केली : खोत
दरम्यान, राजन तेलींना आम्ही रिक्वेस्ट केल्यावर ते शिवसेनेत आले. पक्षातील शिवसैनिकांना पहिल्यांदा विचारलं गेलं होतं. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे मुळ शिवसैनिक असणाऱ्या राजन तेली यांना विचारलं गेल. पक्षात आल्यावर त्यांना उमेदवारी दिल्याचे मत गौरीशंकर खोत यांनी व्यक्त केले.